महाराष्ट्रधक्कादायक : धनगर आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

धक्कादायक : धनगर आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

spot_img

मुंबई : धनगर आरक्षण प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणा संदर्भातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे धनगर समाजात प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. सदरील सर्वच्या सर्व याचिका न्यायमूर्ती गौतम पटेल व न्या. कमल खाटा यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावल्या होत्या.

सदरील निर्णयाच्या विरोधात दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका ( क्र. १४४४६/२०२४ ) दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेची सुनावणी  दि १९ एप्रिल रोजी न्या. जे. के. माहेश्वरी व न्या. संजय करोत यांच्या घटनापिठासमोर झाली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सदरील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे धनगर समाजात नाराजी व  संभ्रम निर्माण झाला असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.  

धनगर जमातीने संभ्रमित होऊ नये

धनगर ST आरक्षण विषयी टीव्ही वर दाखवण्यात येणारी बातमी ही धनगर जमातीने दाखल केलेली आपली प्रबोधन मंच ची 4919/2017 याचिका नाही.  प्रबोधन मंच ने अजून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली नाही. आता दाखल करता येईल का? कशी दाखल करता येईल? यावर विचार-विनिमय चालू आहे.

सुधाकर शेळके सहसचिव – महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...