परभणीमाझा लहान भाऊ महादेव जानकर यांना विजयी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...

माझा लहान भाऊ महादेव जानकर यांना विजयी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परभणीकरांना आव्हान

spot_img

परभणी : येत्या २६ तारखेला परभणी लोकसभा मतदारसंघातून माझा लहान भाऊ महादेव जानकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महायुतीचे उमेदवार तथा  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या प्रचारा निमित्त परभणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.  

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी एनडीए युतीला जनतेचा आर्शीर्वाद हवा आहे. त्यामुळे माझे भाऊ महादेव जानकर यांना विजयी करायचं आहे.’ मोदींनी जानकर यांना जवळ बोलावलं आणि त्यांना शिट्टी हातात दिली. यावेळी जानकर यांनी शिट्टी वाजवत जनतेला अभिवाद केलं. जमलेल्या लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.  यावेळी लाखोंच्या संख्येने परभणी मतदार संघातील मतदार उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...