महाराष्ट्रकोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

spot_img

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १४/९/२०२५ रोजी मुंबईत उत्साहात पार पडली.

      या सभेमध्ये 2 वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी प्रा. प्रदिप झोरे तर कार्याध्यक्ष म्हणून रामचंद्र बाबू आखाडे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारीकरी मंडळामध्ये आर. बि. माने ( उपाध्यक्ष), सुरेश चंद्रकांत शिंदे ( उपाध्यक्ष ), भाऊ धोंडू टोकारे (उपाध्यक्ष ), जयराम बाबाजी शिंदे (उपाध्यक्ष ), प्रदिप जानू खरात (सचिव ), संतोष महादेव गोरे (सहसचिव ), सुरेश बबन बावदाने (खजिनदार ), विजय बबन जानकर (सह खजिनदार) म्हणून यांचा समावेश आहे.

    कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई हे कोकण विभागातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेले सामाजिक मंडळ आहे. मंडळाने अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवून कोकण विभागातील शासनाकडून दुर्लक्षित असलेल्या समाज बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हे मंडळ मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...