
पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार केलेल्या ऐतिहासिक ‘मणिकर्णिका घाट’ वाराणसी महानगरपालिकेने ‘विकासाच्या’ नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबी फिरवून उद्ध्वस्त केला आहे. हा केवळ दगड-मातीचा घाट नसून आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आणि अहिल्यादेवींच्या दातृत्वाची जिवंत साक्ष होती. विकासाच्या नावाखाली अशा ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची मोडतोड करणे अत्यंत निंदनीय आहे. वाराणसी महानगरपालिकेच्या या दुष्कृत्याचे पुण्यश्लोक फाऊंडेशन आणि धनगर माझा परिवाराच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.
खाजगी अहिल्यादेवी होळकर ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज महाराज यशवंतराव होळकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करून या घाटाचे पुनर्वसन करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. तसेच सर्व स्तरावरून याचा निषेध करण्यात येत आहे.




