मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा पाटील हे मागील १९ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. आपल्या व्यवसायासोबतच ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय असतात. याची दखल घेऊन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आयोजित, अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात ॲड. अभिमान पाटील यांना मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम अनिल म्हमाणे यांच्या माध्यमातून मुस्लिम बोर्डिंग हॉल कोल्हापूर येथे दिनांक २५/०१/२०२६ रोजी पार पडला.
एका शेतकरी कुटुंबातून असलेले ॲड. अभिमान पाटील हे आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. विविध न्यूज चॅनेलवर त्यांचे सामाजिक विषयांसंदर्भात मुलाखती आणि चर्चासत्रे उपलब्ध आहेत. ॲड. अभिमानजी जनहित याचिका, सामाजिक न्यायाच्या बाबी, राष्ट्रीय हिताच्या बाबी या प्रकरणांमध्ये नियमितपणे मोफत वकीलपत्र घेतात. ते पर्यावरण संरक्षण उपक्रमांमध्ये सक्रिय असून वंचित आणि उपेक्षित समुदायांना कायदेशीर मदत करतात.
वंचित आणि उपेक्षित समुदायांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना संवैधानिक सक्षमीकरणाद्वारे भारताचे भविष्य घडवण्यास सक्षम करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालय आणि कोल्हापूर खंडपीठ येथे कार्यरत असून ॲड. अभिमान पाटील यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




