पुणेअभिनंदन : IAS होवून डॉ. श्रीकृष्णाने रोवला धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा

अभिनंदन : IAS होवून डॉ. श्रीकृष्णाने रोवला धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा

spot_img

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा आजच निकाल जाहीर झाला असून या मध्ये डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर या धनगर तरुणाने दुसर्‍याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर याने यूपीएससी परीक्षेत देशातून १५५ वी रँक मिळवत उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. 

जळगाव जमोद येथील सर्वसाधारण कुटुंबातील असलेल्या डॉ  श्रीकृष्णची आई गृहिणी असून वडील शेती व्यवसाय करतात. श्रीराम सुशीर यांना ५ अपत्य असून त्यामध्ये ४ मुली व एकाच मुलाचा समावेश आहे. त्यापैकी श्रीकृष्ण व २ मुली डॉक्टर तर २ मुली शिक्षिका आहेत. डॉ  श्रीकृष्णचे  प्राथमिक शिक्षण न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद येथे झाले, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण अकोला येथे तर वैद्यकीय शिक्षण नागपुर येथे घेतले.  सर्वसाधारण कुटुंबातील असल्याची जाणीव ठेवत डॉ  श्रीकृष्णने अहोरात्र परिश्रम घेतले. त्याने दुसर्‍याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन डायरेक्ट आयएएस होण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या यशाने केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या व धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. धनगर माझा परिवाराच्या वतीने संपादक धनंजय तानले यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...