महाराष्ट्रमहर्षी व्यासांचा कृष्ण भगवान(मीमांसा) ग्रंथाचे प्रकाशन....पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास सबंध...

महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान(मीमांसा) ग्रंथाचे प्रकाशन….पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास सबंध मानव जातीला आदर्शवत ठरेल : डॉ. श्रीपाल सबनीस

spot_img
लातूर : राजे मल्हारराव होळकर, महात्मा गौतम बुध्द, भगवान श्रीकृष्ण, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करुन सबंध मानव जातीला आदर्शवत ठरेल असे लेखन डॉ. सलगरे यांनी केले आहे. असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लातूर येथील प्रसिध्द साहित्यिक तथा इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांच्या महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान(मीमांसा) ग्रंथाचे प्रकाशन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. अंकुर साहित्य संघ अकोला, महाराष्ट्र यांचा दुहेरी पुरस्कारप्राप्त लेखक प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांचे साहित्य लेखन हे सबंध मानव कल्याणासाठी आहे, असेही त्यांनी गौरवद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बाबुराव बंडगर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामानुज रांदड, डॉ. देवशीष रुईकर, डॉ. हरिश्चंद्र वंगे, इंजिनियर माधवराव गोरे, प्राचार्य डॉ. संजय गवई, वसंतराव मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले की,  प्रा. मधुकर सलगरे यांनी सुरुवातील प्रास्ताविक करुन ग्रंथाबद्दल माहिती दिली.
यावेळी उपस्थित पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.
या कार्यक्रमाला संभाजी बैकरे, मंचकराव डोणे, डॉ. महेश मोटे, उज्ज्वलकुमार माने, राजपाल भंडे, ललिता सबनीस, अशोक चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...