नांदेडप्रा. मुरहरी कुंभारगावे यांना इतिहास आणि पुरातत्त्व शोध संस्थान कडून डॉक्टरेट पदवी...

प्रा. मुरहरी कुंभारगावे यांना इतिहास आणि पुरातत्त्व शोध संस्थान कडून डॉक्टरेट पदवी प्रदान

spot_img

नांदेड : श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील प्रा. डॉक्टर मुरहरी कुंभारगावे यांना इतिहास आणि पुरातत्त्व शोध संस्थान संग्रहालय बालाघाट मध्य प्रदेश कडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सदर बहुमान इतिहास व शोध संस्थान चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वीरेंद्रसिंह गहरवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संभाजीराव धुळगुंडे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड ) , श्री आनंदराव कुंभारगावे (सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त समाजकल्याण , श्री पिराजी धुळगुंडे माजी सरपंच इत्यादी उपस्थित होते.

      प्रा. मुरहरी कुंभारगावे  यांनी वैभवशाली होळकरांचा इतिहास संशोधन सह  विविध प्रकारच्या साहित्यिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, समकालीन, धार्मिक, शैक्षणिक, निराधार, अपंगांची सेवा आणि इतर सृजनात्मक अशा कार्यांमध्ये सातत्याने  योगदान देऊन अभूतपूर्व प्रगती साधली आहे. या सर्व कामाची दखल घेवून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.

या मिळविलेल्या बहुमानाचा सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...