धुळेधनगरांच्या भज क प्रवर्गामध्ये ठेलारी जमातीचा समावेश, लवकरच अध्यादेश  

धनगरांच्या भज क प्रवर्गामध्ये ठेलारी जमातीचा समावेश, लवकरच अध्यादेश  

spot_img
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार, भटक्या विमुक्त जमाती घटकात १० तत्सम जातींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

आरक्षण यादीत नव्या तत्सम जातींचा समावेश करण्याचा विषय गेले अनेक महिने प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखानुदान अधिवेशन काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जाहिर होणार आहे.

      विशेषतः धनगर समाजासाठी असलेल्या भज क या प्रवर्गामध्ये ठेलारी या मेंढपाळ जातीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ठेलारी जातीचा भटक्या जमाती ब या प्रवर्गामध्ये समावेश होता. ठेलारी ही जात धनगर या मुख्य जमातीची पोटजात आहे.

      राज्य मागासवर्ग आयोगाने यासदंर्भात शासनाला शिफारस केली होती. शासनाने आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत. गेल्या १५ वर्षापासून या जमातीतील व्यक्ति, संस्था व संघटनांनी ठेलारी जातीचा भज क  या प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी अनेकवेळा केली होती. यासाठी धनगर समाजातील अनेक नेत्यांनीही यासाठी प्रयत्न केले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...