अहिल्यानगरअखेर 'अहिल्यानगर' झालंच; महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

अखेर ‘अहिल्यानगर’ झालंच; महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

spot_img

मुंबई : अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव ‘अहिल्‍यानगर’ असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. यादरम्यान राज्य सराकराने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!!

अहमदनगर चे अहिल्यानगर नामांतर करावे यासाठी आमदार राम शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते, संस्था, संघटना यांनी मागणी राज्यसरकारकडे केली होती. यासाठी राज्यभरात, मोर्चे, पदयात्रा, रथयात्रा अशा अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली होती.

नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!” अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अहील्याभक्तांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...