अहिल्यानगरअहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर, पण तालुका व जिल्ह्याचे नामांतर कधी करणार ?

अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर, पण तालुका व जिल्ह्याचे नामांतर कधी करणार ?

spot_img

पुणे : अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केले पण तालुका व जिल्ह्याचे नामांतर कधी करणार असा प्रश्न राज्यातून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजासह राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. यासाठी राज्यातील अनेक व्यक्ती, संस्था व संघटना यांनी शेकडो आंदोलने, मोर्चे काढले होते.

            या मागणीला दुजोरा देत सरकारने दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करत शासन आदेश काढला पण या आदेशामध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, अहमदनगर, तालुका व जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदपुलून ते अहिल्यानगर तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात यावे.  म्हणजे अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केले पण या शहराचा तालुका व जिल्हा लिहताना अहमदनगर च लिहावे लागणार असे स्पष्ट होत आहे.

            खरंतर अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केल्यावर तालुका व जिल्हा अहिल्यानगर च होणे अपेक्षित होते. पण सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अहिल्यानगर तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात यावे असा आदेश काढल्याने संताप व्यक्त होताना दिसून येत आहे. सरकारने कदाचित निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम मतासाठी अहिल्यानगर नामांतर प्रकरणात तालुका व जिल्हा अहमदनगर ठेवून खुट्टा मारल्याचे दिसून येत आहे.

            औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव नामांतर केल्यानंतर त्यांचा तालुका व जिल्हा बदलू शकतो तर मग अहिल्यानगरचा तालुका व जिल्हा का बदलू शकत नाही? असा सवाल विचारला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...