ब्रेकिंगडॉ. बाबासाहेब देशमुखांनी केला आ. शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा सुपडा...

डॉ. बाबासाहेब देशमुखांनी केला आ. शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा सुपडा साप..!

spot_img

सांगोला : शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली असून सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा सुपडा साप केला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीमध्ये शेकापने सर्वाच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत उत्साहात डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवून शेकाप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.

सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक असून विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाइट वॉश दिला आहे. त्यामुळे अनेक राजकीय चमचमीत चर्चेनां उधाण आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...