महाराष्ट्रअभिनंदन : राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे पुरस्कार जाहिर, मा. रामहरी रूपनवर, महादेव जानकर...

अभिनंदन : राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे पुरस्कार जाहिर, मा. रामहरी रूपनवर, महादेव जानकर व गोपीचंद पडळकर यांचा समावेश

spot_img

मुंबई : विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सन २०१८ ते २०२४ या वर्षातील कामकाजा दरम्यान उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीचे पुरस्कार हे एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून बाळासाहेब थोरात (काँग्रेस) ), डॉ. संजय कुटे (भाजप), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप), तर उत्कृष्ट भाषण म्हणून नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी) यांच्यासह ५० जणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे धनगर समाजाचे तथा बहुजनांचे नेते रामहरी रूपनवर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक मा. आ. महादेव जानकर व आ. गोपीचंद पडळकर यांचाही यामध्ये समावेश आहे.

काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी विधान परिषदेत २०१९ – २० मध्ये आपल्या उत्कृष्ट भाषणातून शेतकर्‍यांच्या व धनगर समाजाच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडल्या बद्दल त्यांना उत्कृष्ट भाषणांसाठीचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी विधान परिषदेमध्ये २०२२ – २३ मध्ये तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये २०२३ – २४ मध्ये सामाजिक, राजकीय, साहित्य कला, क्रीडा, शिक्षण, अशा विविध क्षेत्रातील समस्या प्रभावीपणे मांडल्या बद्दल उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.

सदर पुरस्कार लवकर राष्ट्रपती महोद्यांच्या हस्ते देवून गौरविण्यात येणार असल्याने आता या पुरस्कार सोहळ्याकडे पुरस्कार्थी आमदारांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...