महाराष्ट्रचलो पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी ९ सप्टेंबर पासून पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषण

चलो पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी ९ सप्टेंबर पासून पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषण

spot_img

सोलापूर – धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी दि . ९ सप्टेबर पासून राज्यव्यापी “आमरण उपोषण ” होणार असल्याची माहिती सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज उपोषण आंदोलनाचे राज्य समन्वयक प्रा.शिवाजीराव बंडगर यानी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद याना आज या आशयाचे निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी बंडगर बोलत होते. याबाबत अधिक माहिती सांगताना प्रा बंडगर म्हणाले की ,साठ वर्षा पासून धनगर समाज सनदशीर मार्गाने आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. परंतु प्रत्येक सरकारने आश्वासना पलिकडे काही दिले नाही. म्हणून धनगर जमाती मधे असंतोष पसरलेला आहे. विध्यमान राज्य सरकार ने आता तरी तात्काळ आरक्षण अंमलबजावणीचा जी आर काढावा या साठी पंढरपूर येथे येत्या दि ९ सप्टेबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक चेतन नरोटे म्हणाले की , पंढरपूर येथील उपोषणापूर्वी १ सप्टेपासून जेजूरी येथून आरक्षण जागर यात्रा निघणार असून ती ११ तालुक्यातून फिरून पंढरपूर ला येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडे म्हणाले दि ,९ सप्टेबर पासून सुरू होणार्या उपोषण आंदोलना दरम्यान राज्यभरातील धनगर बांधव पंढरपुरात दाखल होणार असून आषाढी चे स्वरूप येणार आहे. माउली हळणवर म्हणाले की , पंढरपूर येथील शिवतीर्थ मैदानावर या उपोषण आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. अर्जुन सलगर यांनी तमाम जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यावेळी सुनील बंडगर, निमीषा वाघमोडे , गंगाधर वाघमोडे ,देवीदास पाटील, काका पाटील ,सुभाष म्हस्के ,देवेंद्र मदने,सिद्धारूढ बेडगनूर , अतुल गावडे ,यशवंत नरूटे , यलगुंड सातपुते ,राम वाकसे ,उमेश काळे ,मधुसूदन बरकडे, महेश गुंठे ,श्रीमंत हाके ,गणपत करे , यतीन देशमुख, बबलू गुंडे, गणपत कटरे ,सिद्धेश्वर सोलंकर, सदाशिव सलगर, तात्या बिचकुले ,योगेश मोटे ,बाळासाहेब वाघमोडे ,पंडीत सातपुते आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...