
सांगवी (ता. बारामती) येथील अजित पतसंस्था व नाथसन फार्मर्सच्या वतीने ज्ञानेश्वर तावरे यांचा वाढदिवस सांगवी येथे ज्ञानेश्वर तावरे व पत्रकारांना सन्मानित करताना मान्यवर, व पत्रकारदिनाचे औचित्य साधून ‘चांडाळचौकडी’ नाटकाचे कलाकार पत्रकार अनिल तावरे, रामदास जगताप, अविनाश हुंबरे यांचा सन्मान झाला. यावेळी प्रा. कोकरे बोलत होते. यावेळी अजित पतसंस्थेचे अध्यक्ष विजय तावरे, प्रा. अंकुश शिंदे, प्रमोद तावरे, प्रदीप तावरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वाढदिवस व इतर उपक्रम साजरा करताना केक कापून तोंडाला फासून नासाडी करतात. विनाकारण फटाक्यांचा खर्च केला जातो. तो खर्च टाळून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त व गरजूंना न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही कोकरे यांनी व्यक्त केले.





