महाराष्ट्रपीडित मेंढपाळ कुटुंबाला तात्काळ मदत करावी : डॉ. प्रमोद गावडे

पीडित मेंढपाळ कुटुंबाला तात्काळ मदत करावी : डॉ. प्रमोद गावडे

spot_img

म्हसवड : मानदेशामध्ये मेंढपाळाच्या वाड्यावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केल्याने १९ मेंढ्यांच्या पिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळांचे प्रचंड नुकसान झाले. तरी शासनाच्या वतीने त्वरित कार्यवाहीकरून पीडित मेंढपाळाला तात्काळ मदत करावी अशी मागणी डॉ. प्रमोद गावडे यांनी केली आहे.
लाडेवाडी तालुका म्हसवड शिवारामध्ये मेंढपाळ सुखदेव खताळ यांचा मेंढ्यांचा वाडा आहे. मेंढ्या चरायला घेऊन गेले असता दुपारच्या वेळी लांडग्याच्या कळपाने वाड्यावर असलेल्या १९ पिलांवर हल्ला केला. त्यामुळे ते जागीच मरण पावले आहेत. यामुळे मेंढपाळाचे प्रचंड नुकसान झाले आहे .
माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर, डॉ. प्रमोद गावडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळाशी संवाद साधून वनविभागाच्या अधिकार्‍यांना लवकरात लवकर कारवाई करून मेंढपाळला मदत देण्याची मागणी केली. सदर घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा झाला असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मेंढपाळाला मदत नोंद देण्याचे आश्वासन दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...