पुणेसौ.प्रतिमा काळे यांच्या "आईची प्रतिमा " या काव्य संग्रहाचे प्रकाशन

सौ.प्रतिमा काळे यांच्या “आईची प्रतिमा ” या काव्य संग्रहाचे प्रकाशन

spot_img

पुणे – कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्या “आईची प्रतिमा” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे, प्रकाशन हडपसर,पुणे येथे अखंडित कल्याणकारी काव्य समुह साहित्य संमेलनामध्ये करण्यात झाले.

रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी अखंडित कल्याणकारी काव्य समुहाचे प्रा.कल्याण राऊत, संमेलानाध्यक्ष मा. सुधाकर झिंगाडे, कवी संमेलनाध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम हिंगणकर, प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे, देशमुख, मा. मारोती(आबा), यांच्या उपस्थितीत संपन्न  झाले. याप्रसंगी लक्ष्मण शिंदे सर,धनंजय इंगळे सर,अशोक सोनवणे सर,प्रमोद सुर्यवंशी,योगिता कोठेकर,दशरथ धायगुडे,योगेश हरणे,गौरव पुंडे,तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक  आवर्जून उपस्थित होते.

सौ.प्रतिमा काळे यांच्या आईचे २ जानेवारी २०२४ रोजी वर्ष श्राद्ध आहे..त्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साहित्यिक मित्र, मैत्रिणीच्या आई विषयावरील कवितांचे प्रातिनिधिक काव्य संग्रह बनवला. त्यास प्रसिद्ध साहित्यिक, योगा शिक्षक, निवेदक, अभ्यासक, तज्ञ मार्गदर्शक मा.हेमंत सामंत सरांची प्रस्तावना, मा.मधुसूदन घाणेकर सर यांच्या शुभेच्छा असून , मा.विजय वडेवराव सर यांचा अभिप्राय लाभला. यात ७८ कवी-कवयित्री यांच्या आई विषयावरील कविता आहेत. सर्वांनी हा काव्यसंग्रह वाचावा अशाच कविता या संग्रहात आहेत

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...