नाशिकP. I. अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

P. I. अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

spot_img

नाशिक :  अंबड पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.

पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज सकाळी ९ च्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ,सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरम्यान यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हेदेखील पोलीस ठाण्यात पोहचले आहे.

पोलीस निरीक्षक अशोक नजन हे मूळचे वैजापूर तालुक्यातील बेळगाव असून ते सदया नाशिक येथे अंबड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...