ब्रेकिंगऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजासाठी राज्य शासनाची फसवी योजना !!

ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजासाठी राज्य शासनाची फसवी योजना !!

spot_img

मुंबई : २०१९ साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना  जाहीर केल्या होत्या. त्या जाहीर केलेल्या योजनांपैकी १ योजना तब्बल ५ वर्षानी राबविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला पण या योजनेच्या नियम व अटी मुळे या योजनेचा धनगर समाजातील एकाही विद्यार्थ्याला लाभ होणार नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजासाठी राज्य शासनाची फसवी योजना जाहीर केल्याचे दिसून येत आहे.

 इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील, भटक्या जमाती क या प्रवर्गातील म्हणजेच धनगर समाजातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्यांना महिना 10000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

      पण या योजनेच्या लाभासाठी. विद्यार्थ्याचे किमान वय १७  वर्ष व कमाल वय १९  वर्ष पेक्षा जास्त असू नये. तसेच विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम किमान ६०  टक्के गुणासह उत्तीर्ण केलेला असावा / असावी. अशी अट आहे.

      कोणत्याही पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थिनीचे वय २१ वर्षापेक्षा कमी असूच शकत नाही त्यामुळे किमान वय १७ वर्ष व कमाल वय १९  वर्ष पेक्षा जास्त असू नये. या अटीमध्ये १ ही विद्यार्थी लाभासाठी पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे शासन याबाबत तात्काळ निर्णय घेते की अजून ५ वर्ष वाट पहायला लावते याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

      शासनाने याबाबत तात्काळ किमान वयामध्ये किंवा शिक्षण यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...