छत्रपती संभाजीनगरधनगर समाजाच्या नाराजीची कॉंग्रेसने घेतली दखल, मेंढपाळ नेते लहू शेवाळेंना दिली मंत्र्याच्या...

धनगर समाजाच्या नाराजीची कॉंग्रेसने घेतली दखल, मेंढपाळ नेते लहू शेवाळेंना दिली मंत्र्याच्या विरोधात उमेदवारी

spot_img

पुणे : मुखेड मतदारसंघातील काँग्रेसचे नेते यशपाल भिंगे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या नाराजीचे पडसाद सोशल मीडियावर उमटताच कॉंग्रेस पक्षाने दखल घेत धनगर समाजातील जय मल्हार सेनेचे संस्थापक तथा मेंढपाळ नेते लहू शेवाळे यांना छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली. यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

            विशेष म्हणजे विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कॉंग्रेसचे लहू शेवाळे ही लढत होणार असल्याने अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.

            या उमेदवारीसाठी लहू शेवाळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. तरीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा फोन करून, निवडणुकीसाठी तयार आहे का, अशी दुपारी विचारणा केली. शेवाळे यांनी होकार देताच रात्री काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव आले.

            धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एम. के. देशमुख यांची उमेदवारी रद्द केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...