पुणेमहाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवेचा निकाल जाहिर, लेखापरीक्षण... अधिकारी पदावर धनगर समाजातील १४ जणांची...

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवेचा निकाल जाहिर, लेखापरीक्षण… अधिकारी पदावर धनगर समाजातील १४ जणांची निवड

spot_img

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवेचा निकाल जाहिर झाला असून निकालात सचिन कानिफनाथ कोळेकर सह १४ जणांची नगरपरिषद प्रशासन संचालनालयात लेखापरीक्षण व लेखा सेवा अधिकारी या पदावर निवड झाली आहे. 

      एकूण २०४ पदांपैकी शिवाजी खरात, प्रणाली जाडकर, मेघा जानकर, यांनी खुल्या वर्गातून निवड झाली तर संकेत लांडगे, शेखर आटोळे, सचिन कोळेकर, महेश कोकळे, बाळासाहेब वडीतके, दत्तात्रेय पांडुळे, हिराराम डोमाळे, आरती सनगर, सारिका ढेपळे, अनिता कोकरे, सचिन ढेरे याची भटक्या जमाती क या राखीव प्रवर्गातून निवड झाली आहे.

      निवड झालेल्या सर्व अधिकार्‍यांचे धनगर माझाचे संपादक व पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी अभिनंदन केले आहे.

      सचिन कोळेकर पुण्यातील नामांकित व्ही.आय .आय .टी. इंजिनिअरिंग कॉलेज,पुणे  इलेक्ट्रोनिक्स शाखेचे व कोल्हार येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथील माजी विद्यार्थी आहेत. सचिनने मिळवलेल्या खडतर यशाच्या निकालाने कोल्हार बु. व त्यांचे मूळ गाव हजारवडी (पानोडी) येथील नागरिक, शिक्षक व पालक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...