महाराष्ट्रभागोजी चॅरिटेबल ट्रस्टचे समाजशील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

भागोजी चॅरिटेबल ट्रस्टचे समाजशील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

spot_img

मुंबई : प्रत्येक कार्यात प्रत्येकालाच सिंहाचा वाटा उचलता येणे शक्य नसतं; परंतू आपापल्यापरीने त्यात सामील होत खारूताईचा वाटा होणे शक्य असते. या उक्तीला अनुसरून गेली अनेक वर्षे भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट रजि. मुंबई वतीने प्रति वर्षी समाजशील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.  प्रतिवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, चर्चगेट – मुबंई येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ समाज नेते राजू जांगळे,  जयसिंगतात्या शेंडगे, बृहन्मुंबई महानगरपालिका मा. उपयुक्त लक्ष्मण व्हटकर, सामाजिक कार्यकर्ते अशोकजी जंगले, अशोक डफले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवेदक राम जांगळी यांनी सामजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांची अनुभवलेले भयानक, रोमांचक समाजाला दिशा देणारी मुलाखत घेतली तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री. धोंडू उर्फ अण्णासाहेब गोरे,  उदय दणदणे, दिनेश सावंत, ऍड-भक्ती कोकरे, कु. अनिकेत धनावडे, कु. शेखर झोरे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच माहेरवाशींनीचा हळदीकुंकू सोहळा या प्रसंगी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राम जांगळी यांनी केले तर संस्थेचे सचिव अनंत देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...