अहिल्यानगरअहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता

spot_img

मुंबई : राज्य सरकारने अहमदनगर शहर, तालुका आणि जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याचा प्रस्तावाला आज राज्याच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. 

गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधी तसेच नागरी संघटनांनी केली होती. यासाठी जिल्ह्यामध्ये नगर नामंतर रथयात्रा सह अंक प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. गेल्याचा महिन्यात अहमदनगर महानगरपालिकेने नाव बदलण्यासंदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवला होता. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून राज्य सरकारने माहिती मागविली होती. या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिकेचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतरण करण्यात येणार आहे. नामांतरणाची प्रक्रिया राज्याच्या महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

अहमदनगर शहराचे आत्ताचे नाव हे त्याचे पहिले शासक अहमद निजाम शाह यांच्या नावावरून पडले आहे. अहमद निजाम शाह याने १५९४ साली बहमनी लष्कराविरुद्ध भिंगार या ठिकाणी लढाई जिंकली त्यापासून जवळच अहमदनगर या शहराची स्थापना करण्यात आली होती. पण १८ व्या शतकात जम्मू कश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यन्त अलौकिक कुशल राजकारभार करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म याच जिल्ह्यातील चौडी या गावी झाला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...