नाशिकया नेत्यांनी मांडला शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा ठराव

या नेत्यांनी मांडला शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा ठराव

spot_img

नाशिक : शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिक येथे संपन्न झाले. या अधिवेशनात विविध ठराव घेण्यात आले. त्यामध्ये धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याबाबतच्या ठरावासह एकूण ३ ठराव घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सदरचा ठराव ठराव खासदार राजन विचारे यांनी मांडला. तर या ठरावाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनुमोदन दिले. त्याबरोबरच महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर सकल मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देताना ओबीसींसह इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणास हात न लावता मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, असा ठराव झाला.

यासोबतच मुंबई आणि मराठी माणसांसाठी प्राणप्रणाने लढण्याच्या ठरावासह कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ठराव सामाजिक सुरक्षा 2020, व्यवसायी सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, वेतन 2019 हे कायदे तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी मंजूर केलेली अधिसूचना तत्काळ रद्द करावी. सरकारी सेवेसाठी नोकरभरती ही कायमस्वरूपी आणि राज्य लोकसेवा आयोगातर्फेच करावी यामध्ये कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती वा संस्थांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असाही ठराव करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...