पुणेउच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज : आ. राम शिंदे

उच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज : आ. राम शिंदे

spot_img

पुणे : समाजामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात पण इतर कार्यक्रमांपेक्षा वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती चांगली असते विशेष म्हणजे अशा कार्यक्रमांना उच्च शिक्षितांचे प्रमाण जास्तच असते. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये उच्चशिक्षितांनी विविध कार्यक्रमातून समाजाप्रति बांधिलकी जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले. ते पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यात बोलत होते. धनगर समाज सेवा संघाचा १६ वा राज्यस्तरीय भव्य वधू वर मेळावा रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव येथे संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, मा. महापौर उषा ढोरे, मा. नगरसेवक नाना काटे, डॉ.लक्ष्मण गोफण,  प्रविण काकडे, उज्ज्वला ताई हाके, डॉ.नारायण सुर्वे, , हनुमंत गावडे, जयवंत कवितके, अजित लकडे, पोपटराव येळे, कैलास राव थोपटे, आशाताईं शेंडगे, राजेंद्र राजापुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी धनगर समाज सेवा संघाचे दिलीप काटकर, विजय भोजणे, , भास्करराव गाडेकर, दर्शन गुंड, रविंद्र कोकाटे, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, डॉ. दिनेश गाडेकर, काळूराम कवितके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद कुचेकर यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...