परभणी : येत्या २६ तारखेला परभणी लोकसभा मतदारसंघातून माझा लहान भाऊ महादेव जानकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या प्रचारा निमित्त परभणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी एनडीए युतीला जनतेचा आर्शीर्वाद हवा आहे. त्यामुळे माझे भाऊ महादेव जानकर यांना विजयी करायचं आहे.’ मोदींनी जानकर यांना जवळ बोलावलं आणि त्यांना शिट्टी हातात दिली. यावेळी जानकर यांनी शिट्टी वाजवत जनतेला अभिवाद केलं. जमलेल्या लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लाखोंच्या संख्येने परभणी मतदार संघातील मतदार उपस्थित होते.