लातूर : राजे मल्हारराव होळकर, महात्मा गौतम बुध्द, भगवान श्रीकृष्ण, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करुन सबंध मानव जातीला आदर्शवत ठरेल असे लेखन डॉ. सलगरे यांनी केले आहे. असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लातूर येथील प्रसिध्द साहित्यिक तथा इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांच्या महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान(मीमांसा) ग्रंथाचे प्रकाशन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. अंकुर साहित्य संघ अकोला, महाराष्ट्र यांचा दुहेरी पुरस्कारप्राप्त लेखक प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांचे साहित्य लेखन हे सबंध मानव कल्याणासाठी आहे, असेही त्यांनी गौरवद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बाबुराव बंडगर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामानुज रांदड, डॉ. देवशीष रुईकर, डॉ. हरिश्चंद्र वंगे, इंजिनियर माधवराव गोरे, प्राचार्य डॉ. संजय गवई, वसंतराव मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा. मधुकर सलगरे यांनी सुरुवातील प्रास्ताविक करुन ग्रंथाबद्दल माहिती दिली.
यावेळी उपस्थित पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.
या कार्यक्रमाला संभाजी बैकरे, मंचकराव डोणे, डॉ. महेश मोटे, उज्ज्वलकुमार माने, राजपाल भंडे, ललिता सबनीस, अशोक चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.