पुणे : धनगर समाजाच्या विविध समस्यांवर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ, पुणे येथे सकाळी 10 वा. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे.
सदर अधिवेशनात सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्वानी संघटीत होऊन काय, कधी आणि कुठे आंदोलन करावयाची आहेत. या पूर्ण आराखड्यावरती चर्चा, विचार विनिमय आणि अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
तसेच पुढील रणनीती आखणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रतील प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात लढा उभा करणे, अनुसूचित जमाती धनगर आरक्षणाची संविधानिक लढाई पुन्हा नव्या जोमाने लढून सरकारला थेट आरक्षणाची अंमलबजावणी करायला भाग पाडने तसेच, जमातीच्या इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.तरी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.