पुणे : आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाला उमेदवारी देण्याबाबत धनगर समाजाच्या एका शिष्टमंडळाने इंडिया आघाडीचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री मा. शरद पवारांची भेट घेतली. यावेळी लोकसभेच्या तीन जागा धनगर समाजासाठी अनुकूल असल्याबाबत मा. शरद पवार यांनी सांगितले.
इंडिया आघाडीने यवतमाळ, हिंगोली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी मी स्वतः खा. राहुल गांधी, खा. मल्लिकार्जुन खरगे, मा. उध्दवजी ठाकरे, मा. ॲड. प्रकाशजी आंबेडकर, मा. सिताराम येचुरी यांच्या सोबत चर्चा करून धनगर समाजाला राजकीय न्याय देणार आहे. सदर उमेदवारी धनगर समाजाला देण्यामध्ये आमचा सुद्धा स्वार्थ आहे. असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार यांची काल बारामती येथे भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यावर अनेकवेळ चर्चा झाल्याचे शिष्ठमंडळाच्या एका नेत्याने धनगर माझाशी बोलताना सांगितले.
या शिष्टमंडळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोंकण विभागासह धनगर समाजाचे नेते ॲड. हरिभाऊ शेळके, हेमंत पाटील, भास्करराव पंडागळे, जयाताई गोफणे, जग्गाभाऊ कोकरे, दादासाहेब काळे, रामभाऊ रूपनर, नानासाहेब वाघमोडे, ॲड. दिनेश पाटील, रावसाहेब रूपनवकर, बापूसाहेब सोलवनकर, डॉ. राजेश कोकरे, मोहन गोफणे, अमित पारेकर, आकाश मोरे, बळवंतराव नाईक, बाबूराव पोले, ॲड. बाळासाहेब नाईक, ॲड. रवि शिंदे, केशवराव नाईक, प्रा. साहेबराव देवकते, कानबाराव शिंदे, साहेबराव मस्के, बाळासाहेब माधवराव नाईक, अशोकराव मस्के, चेतन नरोटे, तुकाराम साठे, अशोक जामकर, बाबूराव शिंदे, बाजीराव मस्के, बाळासाहेब नाईक, केदर गुडेकर, शिवाजी मस्के, दिगांबर साखरे, ॲड.दिलीप नाईक, शंकर ढाले, ॲड. प्रदीप पोले, प्रदीप नाईक, पंकज होडबे, प्रमोद वडकूते, आकाश कारगुडे, भारत पोले यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.