सांगोला: डेन्मार्क येथे होणाऱ्या 16 वर्षे वयोगट बँडी वर्ल्ड कप टुर्नामेंटकरिता,बँडी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय संघाची निवड चाचणी,ॲम्बिअन्स मॉल गुडगाव दिल्ली एनसीआर येथे दि.11 व 12 ऑगस्ट २०२४ रोजी पार पडली.
यामध्ये बँडी असोसिएशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा सचिव श्री संतोष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .
त्यामध्ये प्रणवकुमार जगन्नाथ टकले या खेळाडूची हॉलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली.
सदर खेळाडूंना बँडी असोसिएशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा सचिव संतोष शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
तसेच प्रशिक्षक श्रीनाथ शर्मा व सुहर्ष शर्मा यांनी प्रत्यक्ष सरावाची जबाबदारी पार पाडली .
बॅडिं असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव श्री लवकुमार जाधव असोसिएशन राज्याध्यक्ष श्री चव्हाण सर व राज्य सचिव श्री मदन सर यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन लाभले.