पुणेपुणे येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती व राज्यस्तरीय ‘मल्हाररत्न’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पुणे येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती व राज्यस्तरीय ‘मल्हाररत्न’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

spot_img

पुणे : हिंदुस्थानचा युगपुरुष तथा वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती व राज्यस्तरीय ‘मल्हाररत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात पुणे येथे साजरा होणार आहे.

या कार्यक्रमात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कर्तृत्वाचा जागर केला असून केला जाणार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना मल्हाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  यावेळी भारताचा अत्यंत मानाचा व कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च हिंदकेसरी किताब पटकावल्या बद्दल पैलवान समाधान वाघमोडे पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न होणार आहे. तसेच विविध खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.

      सदर कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, घोले रोड, पुणे येथे रविवार दि. १७ मार्च २०२४  रोजी सायं. ५ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

      सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुण्यश्लोक फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय तानले, उद्योजक अनिल राऊत, पैलवान काळूराम कवितके, उद्योजक रोहिदास गोरे, गोविंद वलेकर, नागेश तितर, संतोष वाघमोडे, रोहित पांढरे, संस्थेचे पदाधिकारी भुजंगराव दुधाळे, राजेंद्र गाडेकर, डॉ. झुंजारराव बदडे, रुक्मिणी धर्मे, दिप्ती तानले, रेश्मा खरात, यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...