कोल्हापूरभारताची महासत्तेकडे वाटचाल, राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल : फरांडे महाराजांची...

भारताची महासत्तेकडे वाटचाल, राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल : फरांडे महाराजांची भाकनूक

spot_img

पट्टणकोडोली : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत फरांडे बाबा यांचा हेडाम खेळ भाकणूक सोहळा पार पडला. राजकारणामध्ये उलथापालथ होऊन भगवा फडकेल, अशी भाकणूक त्यांनी केली.

यात्रेचा पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल बिरदेव यांच्या नावाने ‘चांगभलं…’चा अखंड गजर करत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ झाला. फरांडे बाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात पार पडला. भाविकांनी उधळलेल्या भंडार्‍याने पट्टणकोडोली नगरी सुवर्णमय झाली.

DCIM\100MEDIA\DJI_0176.JPG

भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला असून चार दिवस यात्रेचे धार्मिक विधी होणार आहेत. परंपरेनुसार विधिवत कार्यक्रम सुरुवात झाली. प्रथम गावच्या चावडीत मानाच्या तलवारीची पूजन झाले. मानाच्या तलवारीसह प्रकाश पाटील, रणजित पाटील यांच्यासह गावडे, कुलकर्णी, जोशी, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाचे पंचमंडळी फरांडे बाबांच्या भेटीसाठी व निमंत्रण देण्यासाठी निघाले. ढोल ताशाच्या गजरात व भंडार्‍याच्या उधळणीत आणि ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं…’च्या जयघोषात मिरवणूक भानस मंदिर, कल्लेश्वर मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी 1 वाजता आली. या गादीवर नाना देव फरांडे बाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडारा लोकर, खारीक खोबर्‍याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभार्‍यात हेडाम खेळत तलवार पोटावर मारून घेत भाकणूक कथन करण्यात आली.

दरम्यान, हा हेडाम सोहळा पाहण्यासाठी आणि भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भाविक एकत्र आले होते. बाहेरून आलेल्या भक्तगण विठ्ठल बिरदेवाच्या ओव्या गाताना ठिकठिकाणी दिसत होता. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेला चार राज्यातून लाखो भाविक ऐतिहासिक हेडाम सोहळा आणि फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावतात आणि गावी परततांना भक्ताचे प्रतीक म्हणून घोंगडे खरेदी करतात. त्यामुळे यंदाही घोंगड्याचा व्यापारात लाखोंची उलाढाल झाल्याची पहावयास मिळाली.

अशी केली भाकणूक….

पर्जन्य : नऊ दिवस पावसाची कावड फिरेल, पाऊसकाळ चांगला राहील.

धारण : धारण चढती राहील, महागाई वाढेल.

राजकारण : राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल.

भूमाता : भारताची समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल.

बळीराजा : रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा.

महासत्ता : भारताची महासत्तेकडे वाटचाल

हितसंबंध : बहीण-भावाच्या नात्यातला सलोखा कमी होईल.

रोगराई : देवाची सेवा करील त्याची रोगराई दूर होईल.

रक्षण : मी स्वत: मेंढका होऊन हातात वेताची काठी घेऊन सेवा करणार्‍या भक्ताचे सदैव रक्षण करीन

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...