मुंबई : विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सन २०१८ ते २०२४ या वर्षातील कामकाजा दरम्यान उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीचे पुरस्कार हे एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून बाळासाहेब थोरात (काँग्रेस) ), डॉ. संजय कुटे (भाजप), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप), तर उत्कृष्ट भाषण म्हणून नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी) यांच्यासह ५० जणांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे धनगर समाजाचे तथा बहुजनांचे नेते रामहरी रूपनवर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक मा. आ. महादेव जानकर व आ. गोपीचंद पडळकर यांचाही यामध्ये समावेश आहे.
काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी विधान परिषदेत २०१९ – २० मध्ये आपल्या उत्कृष्ट भाषणातून शेतकर्यांच्या व धनगर समाजाच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडल्या बद्दल त्यांना उत्कृष्ट भाषणांसाठीचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी विधान परिषदेमध्ये २०२२ – २३ मध्ये तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये २०२३ – २४ मध्ये सामाजिक, राजकीय, साहित्य कला, क्रीडा, शिक्षण, अशा विविध क्षेत्रातील समस्या प्रभावीपणे मांडल्या बद्दल उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
सदर पुरस्कार लवकर राष्ट्रपती महोद्यांच्या हस्ते देवून गौरविण्यात येणार असल्याने आता या पुरस्कार सोहळ्याकडे पुरस्कार्थी आमदारांचे लक्ष लागले आहे.