महाराष्ट्रआवर्जून पहा : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक

आवर्जून पहा : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक

spot_img

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलम १५ (४), १५(५), १६ (४) व ४६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) असा नवीन वर्ग तयार करण्यात आला आहे. या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम ५ (१) अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) वर्गासाठी, राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सुधारीत बिंदुनामावली प्रसिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे असे दर्शविले आहे की सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी (एसईबीसी) संदर्भाधीन क्रमांक १ येथील अधिनियमातील कलम ६ अनुसार गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नये. त्यांची नियुक्ती संबंधित आरक्षण बिंदुवर दर्शवू नये. त्यांची नोंद खुल्या प्रवर्गातील बिंदुवर दर्शविण्यात यावी. त्यामुळे धनगर समाजाचा सुधारित बिंदूनामावलीतील बिंदु क्रमांक पूर्वीप्रमाणे ७, ३१, ५७ व ९९ हे पूर्वीप्रमाणे कायम आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...