महाराष्ट्र७०  वर्षीय महिलेवर बलात्कार करुन खुन, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची धनगर समाजाची...

७०  वर्षीय महिलेवर बलात्कार करुन खुन, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची धनगर समाजाची मागणी

spot_img

लातूर : मागच्या काही दिवसांपासून देशभरात बलात्कार आणि खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चिमुकल्या मुली हैवानांच्या शिकार होत आहेत. आता वयस्कर महिलाही सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला हादरवून टाकणारी एक घटना लातूरमध्ये घडली आहे.

कोलकत्ता, बदलापुर, छ. संभाजी नगर, चाकुर तालुक्यातील घटना अशा एक ना अनेक महिलांवर व अल्पवयीन मुलींवर अलीकडच्या काळात होत असलेले अत्याचार पाहत असतानाच मौजे भेटा ता. औसा जि. लातूर येथे ७०  वर्षीय महिलेवर बलात्कार करुण खुन केल्याची घटना घडली आहे. ही बाब अतिशय गंभीर असुन मानुसकीला काळीमा फासणारी आहे.

औसा तालुक्यातील भेटा येथील ७० वर्षीय महिलेवर अमानुषपणे अत्याचार व बलात्कार करुन खुन केल्याबाबतची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. सदर गावातील नराधम मन्सुर सादीक होगाडे याने पिडीत महिलेला स्वतःच्या घरामध्ये ४ दिवस अमानुष अत्याचार करुन नंतर साडीने गळा दाबुन तिचा खुन केला. याप्रकरणी पोलिसांनी मन्सूरला अटक केली.

घटनेनंतर जेव्हा आरोपीची आई गावावरुन माघारी आली तेव्हा तिला घरात दुर्गंधी येत असल्याचे दिसले. घरात मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर आईनेच गावामध्ये याची माहिती दिली.

      याबाबत धनगर समाजातील युवकांच्या शिष्टमंडळाने संबंधीत आरोपीवर ताबडतोब कठोरात कठोर कार्यवाही करुन फासावर लटकवावे अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासन व सरकारकडे केली आहे. ८  दिवसाच्या आत चार्जशीट न्यायालयात दाखल करून केस ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. जर असे नाही झाल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलण छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी अनिल गोयेकर, चंद्रकांत हजारे, सुशील होळकर, अभिमन्यू माने, रघुनाथ बेडदे, नर्सिंग चपटे, परमेश्वर बनसोडे, श्याम माने, हनुमंत कांबळे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...