पुणेभारतीय संस्कृती आत्मसात करा : प्रा. रवींद्र कोकरे यांचे प्रतिपादन

भारतीय संस्कृती आत्मसात करा : प्रा. रवींद्र कोकरे यांचे प्रतिपादन

spot_img
बारामती : वाढदिवसासारखे कोणतेही उत्सव साजरे करताना ग्रामीण भागात विदेशी संस्कृतीकडे ओढा असतो. या गोष्टीमुळे आर्थिक नुकसानीसह मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. यासाठी सामाजिक एकोपा निर्माण करून भारतीय संस्कृतीचे अनुकरण आवश्यक असल्याचे कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी सांगितले.

सांगवी (ता. बारामती)  येथील अजित पतसंस्था व नाथसन फार्मर्सच्या वतीने ज्ञानेश्वर तावरे यांचा वाढदिवस सांगवी येथे ज्ञानेश्वर तावरे व पत्रकारांना सन्मानित करताना मान्यवर, व पत्रकारदिनाचे औचित्य साधून ‘चांडाळचौकडी’ नाटकाचे कलाकार पत्रकार अनिल तावरे, रामदास जगताप, अविनाश हुंबरे यांचा सन्मान झाला. यावेळी प्रा. कोकरे बोलत होते. यावेळी अजित पतसंस्थेचे अध्यक्ष विजय तावरे, प्रा. अंकुश शिंदे, प्रमोद तावरे, प्रदीप तावरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वाढदिवस व इतर उपक्रम साजरा करताना केक कापून तोंडाला फासून नासाडी करतात. विनाकारण फटाक्यांचा खर्च केला जातो. तो खर्च टाळून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त व गरजूंना न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही कोकरे यांनी व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...