Uncategorizedमहाराजा यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेक का केला?

महाराजा यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेक का केला?

spot_img
             भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने धनगर माझाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा ..
             भारतीय इतिहासात पहिले स्वातंत्र्ययुद्ध सुरू करणारे व अखेरपर्यंत अजिंक्य राहिलेले स्वातंत्र्ययोद्ध्ये म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव अमिट आहे. त्यांनी इंग्रजांशी एकूण १८ युद्धे केली, ब्रिटिशांना प्रत्येक युद्धात पराजित करत इंग्रज पार्लमेंटला भारताबाबतची धोरणे बदलायला भाग पाडले. त्याआधी त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याशी हडपसर येथे युद्ध करून अन्यायी पेशवाईचा अस्त केला.
             यशवंतरावांचा मार्ग मात्र अत्यंत हालअपेष्टा आणि संकटांनी भरलेला होता. त्यांचे पैतृक राज्य पेशव्यांनी बरखास्त करून दौलतराव शिंद्यांच्या कह्यात दिलेले होते. तरीही यशवंतरावांनी भिल्लांचे सैन्य उभे करून माळव्याचे आपले राज्य झंझावाती युद्धे करून डिसेंबर १७९८ मध्ये जिंकून घेतले. ही युद्धे
             कमालीच्या युद्धशास्त्रीय डावपेचांनी भरलेली होती. अहिल्यादेवींनी जेथून कल्याणकारी राज्यकारभार चालवला, ते महेश्वर जिंकून घेतल्यानंतर ज्या कारणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, त्याच कारणांनी त्यांनी महेश्वर येथे ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेतला. पेशवे आपल्याला राज्याधिकारी म्हणून मान्यता देणार नाहीत, अन्य मराठा मंडळातील सरदार आपल्याला बरोबरीचे मानणार नाहीत व प्रजेवर अधिकारदर्शक आदेश आपल्याला वैध मान्यतेखेरीज काढता येणार नाहीत व मुस्लिम राजवटीही आपल्याला जुमानणार नाहीत याची त्यांना स्पष्ट कल्पना होती. आपल्या आदेशांना व करारांना वैधता प्राप्त करण्यासाठी एकच पर्याय होता व तो म्हणजे राज्याभिषेक.
            शिवाजी महाराजांनी जसे स्वबळावर स्वराज्य निर्माण केले होते, तसेच यशवंतरावांनीही आपले स्वराज्य स्वबळावरच निर्माण केले हा योगायोग नव्हे. परिस्थिती जरी तेव्हापासून गेल्या दीडेकशे वर्षांत बदलल्या असल्या तरी प्रवृत्ती त्याच होत्या. तसेच विश्वासघातकी, दगाबाज आणि स्वार्थी लोक होते. इंग्रज, फ्रेंच डोके वर काढू लागले होते. पेशव्यांची सत्ता पूर्णतः झुगारण्याची नितांत आवश्यकता होती. आपण सार्वभौम राजे झालो नाहीत तर इंग्रज व फ्रेंचाविरुद्धच्या युद्धात एतद्देशीय संस्थानिक बरोबरीचा मानत आपल्याला सामील होणार नाहीत याची जाण त्यांना . राज्याभिषेक करून घेतला नाही तर एतद्देशीय सत्ता आपल्याला फक्त एक बंडखोरच मानत राहतील, या जाणीवेपोटी यशवंतरावांनी अभिषिक्त राजा होण्याचा निर्णय घेतला.
          महेश्वर जिंकताच राज्याभिषेकाची सारी तयारी, विधी पूर्ण करत यशवंतराव होळकर ६ जानेवारी १७९९ रोजी महेश्वर येथे अभिषिक्त राजे बनले. त्यांनी स्वतःची राजमुद्राही घोषित केली. स्वतंत्र नाणी पाडायला सुरुवात केली. आता ते इतिहासात महाराजा यशवंतराव होळकर म्हणून ओळखले जाणार होते. राज्याभिषेक होताच त्यांनी पहिली राजाज्ञा काढली ती मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांची छत्री बांधण्याची आणि दुसरी घोषणा केली ती इंग्रजांशी आणि फ्रेंचांशी युद्ध सुरू करण्याची.
           आज त्या महान राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महाराजा यशवंतराव होळकर यांना विनम्र अभिवादन !
लेखन : संजय सोनवणी (इतिहास संशोधक )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...