इस्लामपूर : धनगर समाजाचे भवितव्य अंधःकारमय झाले असून धनगर समाजातून निवडून गेलेल्या आमदारांनीही आरक्षणाचा प्रश्न ताकदीने मांडला नाही, अशी खंत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
आतापर्यंत अनेकांनी धनगर आरक्षणासंदर्भात शब्द दिला. पण, प्रत्यक्षात आरक्षण मिळाले नाही. येथून पुढे पक्ष न बघता समाजाला आरक्षणासंदर्भात जो मदत करेल त्याच्यासोबत राहूयात. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जाती-जमातीमधून आरक्षण मिळावे, यासंदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे. यासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे धनगर समाजाचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील धनगर समाजाला आरक्षण मिळाले. महाराष्ट्रात धनगर व धनगड मधील र व ड हा फरक संपवण्यात चालढकल केल्याने समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे.”
ते म्हणाले, “धनाचं आगार संबोधल्या जाणाऱ्या धनगर समाजाने परंपरागत व्यवसाय बंद केला. म समाजावर नोकरी-चाकरी करायची वेळ आली. आमच्यातील काही बांधवांवर झोपडपट्टीत राहण्याची वेळ आली. धनगर आरक्षण संदर्भात २०१४ मध्ये टाटा आयोग नेमला गेला. अद्यापही आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला नाही. असेही ते म्हणाले.