धाराशिव: श्रीक्षेत्र विठ्ठल बिरुदेव देवस्थान पट्ठनकोडोली जिल्हा कोल्हापूर येथिल मुख्य भाकणूककार श्री. श्री. परमपूज्य फरांडे बाबा महाराज यांचा बेंबळी गावात दर्शन सोहळा पार पडला.देव देश धर्माचे संवर्धन व्हावे व सामाजिक ऐक्य अबाधित रहावे यासाठी परमपूज्य फरांडे बाबा हे महाराष्ट्रात प्रवास करत आहेत, या अनुषंगाने त्यांनी काल बेंबळी ता जि. धाराशिव येथिल खंडोबा मंदिरात आगमन झाले.यावेळी श्री. खंडोबा व श्री विठ्ठल बिरुदेव भक्तांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी धनगरी ढोल, हलगी वाजवत महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचे पुष्पहार महावस्त्र देऊन स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करताना धनंजय तानले यांनी पट्टणकोडोली देवस्थानाचे महत्व, महाराजांचे कार्य याविषयी सविस्तर माहिती उपस्थित भक्तांना दिली तसेच ह. भ. प.मोहन वाघुलकर यांनी मार्गदर्शन करत विठ्ठल बिरुदेव देवस्थानाची माहिती दिली. तसेच पांडुरंग पवार यांनी सामाजिक ऐक्य, हिंदु देवदेवतांचे विडंबन, हिंदु श्रद्धांची टिंगलटवाळकी करणारे धर्मविरोधी घटक व राष्ट्रीय एकात्मता याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, राज भडांगे, धनंजय भोसले, बिरू वाघुलकर, सुकाप्पा सोनटक्के , ज्ञानेश्वर तानले यांच्यासह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले.