पुणे..तर एकाही प्रस्थापित पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाहीत

..तर एकाही प्रस्थापित पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाहीत

spot_img

पुणे : भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. यामध्ये जवळपास ५०० तरुण आमरण उपोषण करतील. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर येत्या निवडणुकांत धनगर समाज एकाही प्रस्थापित पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली.

सकल धनगर समाजाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, राजकीय भूमिका, आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा, आगामी निवडणुकीच्या संदभार्ने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते एकवटले होते.

धनगरांना एसटी आरक्षण, विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व, धनगरांचे एकीकरण, कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी, डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा आदी ठराव करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून, विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...