महाराष्ट्रपुणे-पिंपरी चिंचवड मध्ये आज सांगोला तालुका रहिवाशी संघाचा स्नेहमेळावा

पुणे-पिंपरी चिंचवड मध्ये आज सांगोला तालुका रहिवाशी संघाचा स्नेहमेळावा

spot_img

पुणे : स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या सांगोला तालुका रहिवाशी संघ, पुणे – पिंपरी चिंचवड सेवा मंडळाच्या वतीने संवाद मेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.

            या कार्यक्रमात, नोकरी व्यवसायानिमित्त सांगोला तालुक्यातील पुणे विभागात वास्तव्यास असलेल्या सांगोलकरांना एकत्र करुन आपल्या तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती बाबत विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.  

            सदर कार्यक्रम आज दि १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता संत तुकाराम चौक गार्डन व मंगल कार्यालय, डांगे – हिंजवडी रोड, कस्तुरी चौक, वाकड पुणे येथे संपन्न होणार आहे.

            या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज डॉ. बाबासाहेब देशमुख ( अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य), उद्योजक मा. मारुती येडगे, मा. पांडुरंग गावडे, मा. अशोक नरळे, यांच्यासह सांगोला व पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी येथील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने सुभाष कारंडे (कोळे), धनाजी नवले (एखतपूर), काशिनाथ आलदार (कोळे), विनायक चौगुले (वाकी), धनंजय मासाळ (सावे), उमेश बिचकुले (घेरडी), अजिंक्य फुले (खवासपूर), महेश बजबळकर (तिप्पेहळी), गोरख खरात (चिंचोली), अंकुश सातपुते (हलदहीवडी), गोरख वाघमोडे (चिंचोली), समाधान पवार (भाळवणी गट), शिवाजी हांडे (हल्दीवडी) धनाजी माडेकर (धायटी) , अरविंद वेलकर (उदनवाडी), अजय इमडे (कोळे), विनायक पाटील (शिवणे) सह सांगोला तालुका रहिवाशी संघ, पुणे-पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...