ब्रेकिंगदेशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले, १५ राज्यांमधील राज्यसभेच्या निवडणुका जाहिर

देशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले, १५ राज्यांमधील राज्यसभेच्या निवडणुका जाहिर

spot_img

वी दिल्ली : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, , आणि राजस्थान या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने केली. या घोषणेमुळे देशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल.

राज्यनिहाय राज्यसभेच्या जागा
महाराष्ट्र – ६, तेलंगणा – ३, उत्तर प्रदेश – १०,  कर्नाटक – ४, मध्य प्रदेश – ५, उत्तराखंड – १, पश्चिम बंगाल – ५ ओडिशा – ३ आंध्र प्रदेशातील – ३, बिहार – ६, छत्तीसगड – १, गुजरात – ४, हरियाणा – १, हिमाचल प्रदेश – १, आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या ३ जागांचा समावेश आहे. वरील १५ राज्यांमधील ५६ खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील यासहा खासदारांचा कार्यकाळ संपणार

  • कुमार केतकर (काँग्रेस)
  • वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  • प्रकाश जावडेकर (भाजप)
  • मुरलीधरन (भाजप)
  • नारायण राणे(भाजप)
  • अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...