पुणे – कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्या “आईची प्रतिमा” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे, प्रकाशन हडपसर,पुणे येथे अखंडित कल्याणकारी काव्य समुह साहित्य संमेलनामध्ये करण्यात झाले.
रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी अखंडित कल्याणकारी काव्य समुहाचे प्रा.कल्याण राऊत, संमेलानाध्यक्ष मा. सुधाकर झिंगाडे, कवी संमेलनाध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम हिंगणकर, प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे, देशमुख, मा. मारोती(आबा), यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी लक्ष्मण शिंदे सर,धनंजय इंगळे सर,अशोक सोनवणे सर,प्रमोद सुर्यवंशी,योगिता कोठेकर,दशरथ धायगुडे,योगेश हरणे,गौरव पुंडे,तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक आवर्जून उपस्थित होते.
सौ.प्रतिमा काळे यांच्या आईचे २ जानेवारी २०२४ रोजी वर्ष श्राद्ध आहे..त्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साहित्यिक मित्र, मैत्रिणीच्या आई विषयावरील कवितांचे प्रातिनिधिक काव्य संग्रह बनवला. त्यास प्रसिद्ध साहित्यिक, योगा शिक्षक, निवेदक, अभ्यासक, तज्ञ मार्गदर्शक मा.हेमंत सामंत सरांची प्रस्तावना, मा.मधुसूदन घाणेकर सर यांच्या शुभेच्छा असून , मा.विजय वडेवराव सर यांचा अभिप्राय लाभला. यात ७८ कवी-कवयित्री यांच्या आई विषयावरील कविता आहेत. सर्वांनी हा काव्यसंग्रह वाचावा अशाच कविता या संग्रहात आहेत