पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन उत्तरेत स्वत:चे साम्राज्य उभे करणारे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या घोड्यावरील चित्राचे अनावरण ओबीसींचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार टीपी मुंडे, आमदार महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
६ जानेवारी १७९९ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक झाला होता. या दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे घोड्यावरील चित्र सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार असिफ शिकलगार यांनी साकारले आहे. यापूर्वी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे घोड्यावरील चित्र तसेच श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचेही चित्र साकारले आहे.
सदर चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.