नांदेडप्रयागबाई - बळीराम कुंभारगावे दाम्पत्याचा राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्काराने सन्मान

प्रयागबाई – बळीराम कुंभारगावे दाम्पत्याचा राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्काराने सन्मान

spot_img

कंधार : डोक्यावर पटका, धोतर, हातात काठी अन दुसऱ्या हातात नववारीतील आपल्या सहचारिणीचा हात धरून आलेली जोडपी, नाव जाहीर होताच नातवांनी केलेला एकच जल्लोष….  आई- वडलांच्या कौतुकाने दाटलेला कंठ अन डोळ्यात दाटलेले अश्रू आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान असे हृद्य चित्र होते सुसंगत फौंडेशन राज्यस्तरीय आदर्श माता-पिता सन्मान पुरस्कार वितरण समारंभाचे.

पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहामध्ये शनिवारी (दि. २७) रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महाराष्ट्र इकोनॉमिक्स कौन्सिलचे सल्लागार सचिन इटकर यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील लालवाडी (ता. कंधार) येथील प्रयागबाई – बळीराम कुंभारगावे या दाम्पत्यासह राज्यभरातून आलेल्या तीसहुन आलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उद्याेजक सोपान वेळे, डॉ. आशुतोष रारावीकर फौंडेशनचे संस्थापक सुधाकर न्हाळदे, सचिव संगीता न्हाळदे, विजयकुमार ठुबे, माजी सनदी अधिकारी आनंदराव कुंभारगावे, प्रा. मुरहरी कुंभारगावे आदि उपस्थित होते.

‘पाश्चिमात्त्य देशात आज समाजव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली दिसते. अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळलेले आढळतात. पाल्य आणि पालक यांच्यामध्ये असणारा ओलावा आटत गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तसे आपल्याकडे होऊ नये यासाठी परस्परातील प्रेमाचे बंध अधिक दृढ करणे गरजेचे आहे. त्यासाठी माता-पिता सन्मानसारखे आनंदसोहळे मोलाचे ठरतात,’ असे मत डॉ. विद्यासागर यांनी व्यक्त केले.

‘इथे आलेल्या बहुतांश ज्येष्ठांनी काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन त्याना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले, त्यातूनच खऱ्या अर्थाने ‘भारता’ची वाट ‘इंडिया’च्या दिशेने सुरू झाली. आजच्या ‘इंडिया’तील ‘इक्वलिटी ऑफ अपोर्च्युनीटी’ ही ‘भारता’च्या या सुरकुतलेल्या हातानी केलेल्या कष्टावर पोसली आहे, अशा शब्दात सचिन इटकर यांनी आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर न्हाळदे यांनी केले. सूत्रसंचालन माणिक सोनवलकर आणि जागृती कुलकर्णी यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...