नाशिक : अंबड पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.
पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज सकाळी ९ च्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ,सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरम्यान यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हेदेखील पोलीस ठाण्यात पोहचले आहे.
पोलीस निरीक्षक अशोक नजन हे मूळचे वैजापूर तालुक्यातील बेळगाव असून ते सदया नाशिक येथे अंबड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.