चौंडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असुन सर्वांना प्रेरणादाई आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास समजावून घेतला पाहिजे, चौंडी हे गांव पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. वर्षातुन जयंती व पुण्यतिथी असे दोन वेळा समाज बांधवांनी चौंडीस आले पाहिजे. या तिर्थ क्षेत्राचा अजून भरपूर विकास करावयाचा आहे. महासंघाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात अहिंल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे मत महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.
चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिंल्यादेवी होळकर यांच्या २२९ व्या पुण्यतिथी समारंभानिमित्त आयोजीत राज्यव्यापी धनगर समाज अभिवादन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवर व महासंघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिंल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व दिप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे, अहिंल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलकाताई गोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री, आमदार प्रा. राम शिंदे प्रमुख पाहूणे बोलताना म्हणाले कि, चौंडी आमच्या गांवी राज्यभरातुन मोठ्या संख्येने समाज बांधव येत असतो, चौंडी विकासाची सर्व कामे मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणेने होत आहेत. चौंडी विकासाचे शिल्पकार हे मा. श्री. आण्णासाहेब डांगे आहेत. विकास कामासाठी त्यांनी केलेला त्याग हा अतिशय महत्वाचा आहे. राज्य सरकार चौंडी विकासासाठी लागेल ते सहकार्य करणार आहे. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अँड. रामहरी रूपनवर म्हणाले कि, चौंडीचा कायापालट आण्णासाहेबांनी केला आहे. आजच्या तरूण पिढीला इतिहास कळायला लागला, आदर्श कारभार अहिंल्यादेवीनी केला आहे. पुण्यश्लोक हि पदवी त्यांना मिळाली आहे. जगातील आदर्शस्थान अहिल्यादेवी होळकर आहेत. अहिल्यादेवीनी हजारो मंदीरे बांधली, मशीदी बांधल्या सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण केले, श्रध्दा ठेवली तर फळ मिळते, चौंडी हे पवित्र स्थळ आहे. समाज बांधवांनी ऐकिने राहून समाजामध्ये जनजाग्रण करून इतिहास समजावून घेतला पहिजे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले.यावेळी माजी आमदार श्री. पोपटराव गावडे, श्रीरामभाऊ पुंढे, मल्हार सेनेचे सरसेनाती बबनराव रानगे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलकाताई गोडे, महामंत्री सुभाषभाऊ सोनवने, महासंघाचे सरचिटणीस सुनिलभाऊ वाघ, सांगली मिरज कुपवाडच्या महापौर सौ. संगिता खोत यांनी मनोगते व्यक्त केली.राज्यव्यापी अभिवादन मेळाव्यास पांडूरंग काकडे, संदीपराव तेले, उमेश घुरडे, व्यंकटराव मोकले, सौ. पुष्पाताई गुलवाडे, सांगलीच्या नगरसेविका सौ. सविता मदने, कल्पना कोळेकर, डॉ. पांडूरंग टोंन्पे, संभाजीराव बैखरे, छगनराव नांगरे, संजयदादा पाटील, सौ. निर्मलाताई पाटील, अमर ढोणे, नानासाहेब गाडेकर, गंगाधर केसाळे, सुभाष मैदाड, पंढरीनाथ ढाळे, अशोक थिटे, नारायण बोबडे, बयाजी शेळके, किसन गावडे, अविनाश खरात, सुनिल मलगुंडे, प्रकाश कनप, उमेश गावडे, शिवाजी यमगर यांच्यासह राज्यभारातुन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन मेळाव्याचे संयोजन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले, सुत्रसंचालन श्री. बजरंग कदम यांनी तर शेवटी आभार वासुदेव आसकर यांनी मानले. उपस्थित समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले.