सांगली: महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व जिल्ह्यातील पदाधिकारी व सर्व समाज बांधव यांच्या वतीने मंगळवार दिनांक २०/८ / २०२४ ते रविवार दिनांक २५ / ८ / २०२४ अखेर सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली.
संदेश यात्रेच्या दौऱ्याचा तपशिल पुढील प्रमाणे, पहिला दिवस वाळवा व शिराळा तालुका मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता शिराळा येथील मोरणा बिरोबा मंदीरापासुन या यात्रेचा प्रारंभ होणार असुन रेड, रेठरेधरण, पेठ, इस्लामूपर, साखराळे, हुबालवाडी, बोरगांव, खेड, वाळवा, आष्टा येथे मुक्काम. दुसरा दिवस पलुस व कडेगांव तालुका बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता भिलवडी, अंकलखोप, आमनापूर, बुर्ली, रामानंदनगन, कुंडल, पलुस, वांगी, कडेगांव, वडीयेरायबाग, आमरापूर, शिवणी, विटा येथे मुक्काम. तिसरा दिवस खानापूर व आटपाडी तालुका गुरूवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता भांबर्डे, साळशिंगे, भेंडवडे, वेजेगांव, भिकवडी, लेंगरे, भुड, जाधवनगर, खानापूर, करंजे, भिवघाट, मानेवाडी, मेटकरवाडी, गोमेवाडी, करगणी, बनपूरी, आटपाडी येथे मुक्काम. चौथा दिवस जत व कवठेमहांकाळ तालुका शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता बेवनुर, गुळवंची, कोसारी, रेवनाळ, अचकणहल्ली, कारदगणी, भोळेश्वर, सनमडी, माडग्याळ, गुड्डापूर, दरीबडची, मुंचडी, जत येथे मक्काम. पाचवा दिवस तासगांव व मिरज तालुका शनिवार दि. २४ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजता डफळापूर, कोकळे, आलकुड, ईरळी, ढालगांव, आरेवाडी, नांगोळे, कवठेमहांकाळ, शिरढोण, अंजणी, सावळज, यमगरवाडी, वायफळे, मोराळे, पेड, बलगवडे, बस्तवडे, खुजगांव, कौलगे, लोढे, चिंचणी, तासगांव, कवठेएकंद, कुमठे येथे मुक्काम, सहावा दिवस सांगली मिरज व कुपवाड शहर रविवार दि. २५ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजता मिरज मिशन चौक, शिवाजी महाराज पुतळा, मिरज मार्केट, बिरोबा मंदिर, मिरज स्टेशन, हिरा हॉटेल चौक, शिवाजी रोड, गांधी चौक, विजयनगर (यशवंतराव होळकर चौक), भाऊराव चौक, राम मंदीर, स्टेशन चौक, टिळक चौक, सांगलवाडी, दत्तनगर (कर्नाळ चौक), माधवनगर बायपास, कॉलेज कॉर्नर, संजय नगर, लक्ष्मी मंदीर, सूतगिरणी चौक, मल्हारराव होळकर चौक व या संदेश यात्रेचा समारोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात सायंकाळी ७:०० वाजता जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत होणार आहे.
संदेश यात्रेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तरी वरील गावांमध्ये अहिल्या संदेश यात्रा येणार असुन समाज बांधवांनी यामध्ये मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे व महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. संजयदादा पाटील यांनी केले आहे.
अहिल्या संदेश यात्रा यशस्वितेसाठी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्यासह धनगर समाज महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. संजयदादा पाटील, मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख श्री. शंकरराव वगरे, अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा सौ. सविता मदने, कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. जगन्नाथराव कोळपे, सांस्कृतीक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव टकले यांच्यासह महासंघाचे जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व समाजबांधव नियोजन करित आहेत.