कोल्हापूरश्री. फरांडे बाबांची भाकनूक ठरली सत्य, राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात फडकला भगवा

श्री. फरांडे बाबांची भाकनूक ठरली सत्य, राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात फडकला भगवा

spot_img

पुणे : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री फरांडे बाबा यांनी केलेली भाकणूक अखेर खरी ठरली आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

              दिनांक २१ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथे श्री विठ्ठल बिरदेव यांच्या नावाने ‘चांगभलं…’चा अखंड गजर करत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत श्री फरांडे बाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात पार पडला होता.  यावेळी राजकारणामध्ये उलथापालथ होऊन राज्यात भगवा फडकेल, अशी भाकणूक त्यांनी केली होती. विशेष म्हणजे सर्व प्रसार माध्यमासहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर विश्वास ठेवून आपल्या भाषणातून उल्लेख केला होता.

               यापूर्वीहि पट्टणकोडोली यात्रेत फरांडे बाबांनी अनेक भाकणूका केल्या होत्या. त्या सत्य ठरल्या आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल बिरुदेव व फरांडे बाबा भक्तांमध्ये आनंदाचे, चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...