महाराष्ट्रम्हसवड  : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी २७ जानेवारी पासून पुन्हा आमरण उपोषण सुरु

म्हसवड  : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी २७ जानेवारी पासून पुन्हा आमरण उपोषण सुरु

spot_img

म्हसवड : धनगर समाजाची दिशाभुल न करता धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजातील युवकांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.

दि. २७ पासुन  म्हसवड पालिकेसमोर उत्तम विरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या ३ युवकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. ज्या – ज्यावेळी समाजाने एस.टी.आरक्षणाची मागणी केली त्या त्यावेळी शासनाने समिति नेमून धनगर समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वास्तविक आम्ही जे आरक्षण मागत आहोत ते आम्हाला घटनेनेच दिलेले आहे, मात्र त्यात धनगर व धनगड या शब्दाचा घोळ शासनानेच घातलेला आहे. असेही आंदोलकांनी म्हटले आहे.

या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा दर्शिवला आहे तर अनेक मान्यवरांनी भेट देत त्यांच्या भूमिकेचे समर्थन  केले आहे. दरम्यान म्हसवड येथे सुरु असलेल्या सदर उपोषणास माण – खटावच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, माणचे तहसिलदार विकास अहिर आदींनी भेट देत उपोषणकर्त्यांची चर्चा करीत त्यांचे म्हणणे ऐकुन घेत याबाबत वरिष्ठांना कळवण्याचे आश्वासन दिले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...